HOME   लातूर न्यूज

लातुरातील बेघर लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण

लातूर महानगरपालिकेचा पुढाकार, पण हद्दीपर्यंतच मर्यादित


लातुरातील बेघर लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण

लातूर: लातूर शहर महानगर पालिका हद्दीतील बेघराचे शासनाच्या वतीने त्रयस्थ संस्थेमार्फत बेघर/ निराधारांचे सर्वेक्षण करत आहे जे फूटपाथवर, चौकात, उड्डाण पुलाखाली, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानक परिसरात राहतात ज्यांचे आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतेही घर नाही, जे लोक रस्त्यावर किंवा राहण्यायोग्य नसलेल्या परिस्थितीमध्ये राहतात, त्यांच्याकडे अनुकूल सुविधा नसतात. महानगरपालिका वतीने अशा व्यक्तींना संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या कारणास्तव बेघरांच्या सर्वेक्षणाद्वारे सर्वसाधारण तपशील, कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती, आरोग्य स्थिती संदर्भात तपशील गोळा करीत आहे. आपल्या शहरातील सर्व भागामध्ये सर्वेक्षक जाऊन बेघरांचे सर्वेक्षण १८/०५/२०१९ ते २२/०५/२०१९ या कालावधीमध्ये दिवसा व रात्री करण्यात येणार आहे. सर्व बेघरांचे सर्वेक्षण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. जर त्यांना असे निराधार किंवा बेघर लोकं रस्त्यांवर किंवा इतर भागात आढळल्यास ७९९७००७१६७ या क्रमांकावर संपर्क साधून सर्वेक्षणामध्ये मदत करावी. ज्यामुळे महानगरपालिकेला अशा बेघरांना निवारा देण्यात मदत करता येईल तरी नागरिकांनी हे सर्वेक्षण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन, शहर प्रकल्प अधिकारी, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, लातूर शहर महानगर पालिका, लातूर यांनी केले आहे.


Comments

Top