HOME   लातूर न्यूज

लातुरात कलावंतांनी केलं रक्तदान

चार संस्थांचा सहभाग, २३ रक्तदाते, छोटू हिबारेचं ११२ वं रक्तदान


लातुरात कलावंतांनी केलं रक्तदान

लातूर: लातुरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक जबाबदारी म्हणून लातूर येथील रक्तदाता फाऊंडेशन, दीपस्तंभ परिवार, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व लातुरातील संगीत क्षेत्रातील कलावंत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते त्यात २३ कलावंत रक्तदात्यांनी रक्तदान केले. उमाटे क्लासेस येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा माऊली क्रिटिकल केअरचे संचालक डॉ अरविंद भातांब्रे, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन चे अध्यक्ष डॉ राजगोपाल तापडिया व डॉ रविराज पोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ भातांब्रे व डॉ तापडिया यांनी रक्तदानाची चळवळ लातूर जिल्ह्यात रोटरी क्लब व दीपस्तंभ परिवार यांच्या वतीने चालू आहे. आता सोबत रक्तदाता फाउंडेशन ही सोबतीला आल्यामुळे अधिक जोमाने ही चळवळ पुढे जाऊन गरजू रुग्णांना याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून कलावंतांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व कलावंतांचे अभिनंदन या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. सदरील रक्तदानात आकर्षणाची बाब म्हणजे टाक दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक रक्तदान केले व १११ वेळेस रक्तदान करणारा कलावंत छोटू हिबारे यांनीही या प्रसंगी रक्तदान केले. उपास्थित मान्यवरांचा सत्कार कपिल धाराशिवे, बालाजी पिंपळे, उमाटे सर यांच्या हस्ते मान्यवरांचा तर मान्यवरांच्या हस्ते टाक दाम्पत्याचा व छोटू हिबारेंचा शाल, हार, वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनू डगवाले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा शशिकांत देशमुख व आभार किशोर बुरांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल अयाचित, चेतन पंढरीकर, संदीप जगदाळे, शिवकुमार उरगुंडे, महेश काकनाळे, महेश बिडवे, वैभव चव्हाण, सदानंद होरे, बालाजी पिंपळे, सचिन हुरदळे, हरिष जोशी, आकाश जाधव आदींनी परिश्रम घेतले.


Comments

Top