HOME   लातूर न्यूज

सावरकर जयंतीनिमित्त रक्तदान आणि वृक्षांचे वाटप

अत्रिवरद प्रतिष्ठानचा उपक्रम, दरवर्षी राबवले जातात अनेक सामाजिक उपक्रम


सावरकर जयंतीनिमित्त रक्तदान आणि वृक्षांचे वाटप

लातूर: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३६ वी जयंती अत्रिवरद प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. अत्रिवरद प्रतिष्ठान, लातूर द्वारा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती दरवर्षी मोसाजरी केली जाते. जयंती निमित्त रक्तदान, वृक्षारोपण, व्याख्यान असे अनेक विधायक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी अत्रिवरद प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दुष्काळा मध्ये वृक्षारोपणाचे महत्व समाजाला कळावे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी' या संत तुकोबांचा विचाराप्रमाणे वृक्षलागवडीची चळवळ समाजामध्ये गतिमान व्हावी या बांधीलकीतून १३६ वृक्षांचे वाटप करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. अशा गरजूंना मदत करण्यासाठी प्रतिष्ठानद्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला.
प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात आले. अभिवादन सभेत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह नितीन शेटे, लातूर विज्ञान केंद्र व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक संजय देशपांडे, सावरकर साहित्याचे अभ्यासक राहुल देशमुख आदी प्रमुख मान्यवरांनी सावरकरांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अत्रिवरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिवणगीकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ गिरीश कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, नितीन शेटे संजय देशपांडे, राहुल देशमुख, लक्ष्मीकांत कुलकर्णी, किशोर पवार, वैभव डोंगरे, अक्षय चवळे, भारत शेरेकर, दत्ता माळी, माधव जोशी, वामन संधीकर, शिवराज मुळावकर, शिवाजी सगरे आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अत्रिवरद प्रतिष्ठान दिव्यांग प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रा. विनोद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सचिव जयकिरण परदेशी, संतोष बेंबळकर, गणेश शहाबादे, मिलिंद शेटे, प्रकाश जखोटीया, आशिद बनसोडे, विशाल पांगरे, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर गोसावी, विवेक डोंगरे पद्माकर दळवी यांनी परिश्रम घेतले.


Comments

Top