HOME   लातूर न्यूज

आवर्तन संगीत: स्वागताध्यक्षपदी शैलेश गोजमगुंडे

३० जून २०१९ रोजी सुवर्ण महोत्सवी संगीत मैफल


आवर्तन संगीत: स्वागताध्यक्षपदी शैलेश गोजमगुंडे

लातूर: आवर्तन प्रतिष्ठान, लातूर व अष्टविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पन्नास महिन्यांपासून अविरतपणे अभिजात शास्त्रीय संगीत कला प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रत्येक महिन्यात एका मासिक संगीत सभेचे आयोजन केले जाते. एक चळवळ म्हणून सुरू झालेल्या या मासिक संगीत सभेतून स्थानिक कलावंतांबरोबर मराठवाडा, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील अनेक कलावंतांनी हजेरी लावली. यातून अनेक नवीन कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध झालेच आहे तर अनेक कानसेन रसिक श्रोते ही निर्माण झाले आहेत.
३० जून २०१९ रोजी ५१ वी सुवर्ण महोत्सवी मासिक संगीत सभा मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या सुवर्ण महोत्सवी संगीत सभेच्या स्वागताध्यक्षपदी नाट्य कलावंत शैलेश गोजमगुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर विशाल जाधव यांची कार्यक्रम प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. लातूर शहरातील सर्व रसिकांना व संगीत प्रेमींनी रविवार ३० जून २०१९ रोजी संपन्न होणार्‍या सुवर्ण महोत्सवी संगीत मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन आवर्तन परिवार व आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा आणि सचिव डॉ. रवी पोरे यांनी केले आहे.


Comments

Top