लातूर: महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६७-अ व १५०-अ अन्वये लातूर शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेची रितसर बांधकाम परवानगी न घेता अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम केले आहे, अशा सर्व मालमत्ताधारकास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६७-अ अन्वये मालमत्ताकराची दुप्पट आकारणी करण्यात येणार आहे तसेच ज्या ईमारती आर्थिक वर्षामध्ये करपात्रसाठी पात्र असतील व अशा मालमत्ताधारकानी आपल्या ईमारतीस मालमत्ताकराची आकारणी केली नाही अशा इमारतीस महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १५०-अ अन्वये मागील पाच वर्ष व चालू एक वर्ष एकुन सहा वर्षाचा मालमत्ताकर आकारणी करून कर वसुल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार आयुक्त एमडी सिंह यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार आमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. शहरातील ज्या मालमत्ताधारकानी अपल्या इमारतीचे बांधकाम करतेवेळी महानगरपालिका, लातूर यांच्याकडून रितसर बांधकाम परवानगी घेतली असेल अशा सर्व मालमत्ताधारकानी आपल्याकडील बांधकाम परवाना प्रत व नकाशाची प्रत सात दिवसाच्या आत संबधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे जमा करावी. अन्यथा अपल्या मालमत्तेस अनधिकृत बांधकाम गृहीत धरून अधिनियमातील कलमाची अमलबजावणी करण्यात येईल असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Comments