HOME   लातूर न्यूज

लातूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीम मशीन संशयास्पद

मतमोजणीत ६६ मतांची वाढ कशी? गारकरांची फेरनिवडणुकीची मागणी


लातूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीम मशीन संशयास्पद

लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ७० हजार ३९८ मतदान झाले असताना झालेल्या मतदानापैकी ११ लाख ७० हजार ४६४ मतांची मोजणी करण्यात आली. सर्व आकडेवारी पाहता ६६ मते जास्त असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार राम गारकर यांनी केला आहे. यामुळे फेरनिवडणूक घ्य़ावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राम गारकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करुन याबाबतची माहिती प्रसिद्धीस दिली आहे. नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभा निवडणुका आणि त्यात झालेल्या एकूण मतदानापैकी ६६ मते कशी वाढली, याचा आधार काय? याची चौकशी व्हावी अशी मागणी गारकर यांनी केली आहे. मतदानानंतरचा ३५ दिवसाचा कालावधी, ३ उमेदवारात असलेली मतांची तफावत आणि जर अशा प्रकारे तफावत होत असल्याने मतदारांचा ईव्हीम मशीनवर संशय वाढत आहे.


Comments

Top