HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्यातील ३९ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

जिल्ह्यातील ३३ उपनिरीक्षकांचा समावेश


लातूर जिल्ह्यातील ३९ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

लातूर: लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३९ जणांच्या बदल्या करण्यात आल्याबाबतचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जारी केले आहेत. ज्यामध्ये जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षक पाच सहायक पोलीस निरीक्षक आणि ३३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे करण्यात आल्या आहेत. लातूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलंवडे यांची परभणी, तसेच पोलीस दलात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, नांदेड सुनिल रेजितवाड,
परभणी, शिवदास लहाने परभणी, संदीप कामत यासोबतच ३३ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.


Comments

Top