लातूर: भोकरंबा गावात भिसे कुटुंबियात झालेल्या हाणामारीत आ. त्र्यंबक भिसे यांचा मुलगा विश्वजित भिसे याला भोसकण्यात आले. डॉ. शिवाजी भिसे यांना बेदम मारहाण करण्यात आली. डॉ. भिसे यांच्या शरिरावर अनेक प्रकारचे वळ दिसून आले. विश्वजितवर लातुरच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
पोहरेगावातील भिसे कुटुंबियात जमिनीचा वाद आहे. काल रात्री डॉ. भिसे आणि विश्वजित शेतात गेले. यावेळी नांगरणीचे काम सुरु होते. एवढ्यात भिसेंच्या भावकीतील मंडळी आली. बाचाबाची झाली आणि हाणामारी सुरु झाली. डॉ. भिसे यांना जबर मारहाण झाले तर विश्वजितला भोसकण्यात आले. हाणामारी करणारे बहुतांशजण पळून गेले. या प्रकरणी आज उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची आणि त्या पुढील पोलिसांची कारवाई सुरु होती.
Comments