HOME   लातूर न्यूज

लातूर ग्रामीणमधील रस्त्यांच्या कामांना मंजूरी

धीरज देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामांना गती


लातूर ग्रामीणमधील रस्त्यांच्या कामांना मंजूरी

लातूर: ग्रामस्थांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या रस्त्यांच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्यामुळे लातूर ग्रामीणमधील रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. या रस्त्यांची कामे एसआरएफ फंडातून होणार आहेत. धीरज देशमुख यांनी पाठपुरावा केल्यामुळेच बाभळगाव बसस्थानक ते बोरी सिमेंट काँक्रीट रस्ता, लातूर ग्रामीणमधील मुरूड-माटेफळ रस्ता डांबरीकरण, येळी ते जोडजवळा रस्ता डांबरीकरण, राष्ट्रीय मार्ग 232 ते सेवादासनगर रस्ता मजबुतीकरण करणे, राष्ट्रीय मार्ग – 236 ते हवाई धावपट्टी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, टाकळी शि. ते काळमाथ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, मसला ते पिंपरी अंबा रस्ता खडीकरण, राष्ट्रीय मार्ग – 232 ते दवणगाव रस्ता सिमेंट काँक्रीट, फरदपूर ते सेवानगर तांडा रस्ता डांबरीकरण, पोहरेगाव ते इटी रस्ता डांबरीकरण, रामवाडी ख ते कुंभारवाडी रस्ता डांबरीकरण, टाकळगाव ते घनसरगाव रस्ता डांबरीकरण व मौ.येल्लोरी ते शिंदाळा रस्ता नुतणीकरण करणे या 14 रस्त्यांचा कामास मंजुरी मिळाली असून या रस्त्यांची कामे एसआरएफ फंडातून होणार आहेत.


Comments

Top