लातूर: सध्या मराठवाड्यात उद्भवलेली नैसर्गीक दुष्काळी परिस्थीती व शासनाची सतत राहीलेली उदासिनता त्यामुळे संबंध मराठवाडयातील सर्व विभाग व क्षेत्रावर अमुलाग्र परिणाम झालेला असुन शासनाने नियोजीत केलेला मराठवाडा अनुशेष व वैधानिक विकास महामंडळामार्फत कोणत्याही अद्याप उपाय योजना केल्या जात नसल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विकासाचा अनुशेष वाढलेला आहे. या बाबीवर तसेच मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्नावर विचारमंथन व चर्चा व्हावी,याबाबत दयानंद सभागृह, लातूर येथे १५ जून २०१९ रोजी राज्याचे मंत्री व सर्वपक्षीय खासदार, आमदार तसेच सर्व क्षेत्रातील जेष्ठ विचारवंत, सर्व विषयाचे गाढे अभ्यासक प्रसिध्द वक्ते यांना निमंत्रित करून भव्य व व्यापक स्वरूपात मराठवाडा विकास परिषद आयोजित केले असल्याची माहिती या परिषदेचे अध्यक्ष डॉ.जे.एम.वाघमारे यांनी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
या विकास परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तसेच अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत डॉ.जे.एम.वाघमारे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ना.अर्जुन खोतकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, बिजभाषक राष्ट्रीय जलतज्ज्ञ, राजेंद्रसिंह, प्रस्तावना अॅड.मनोहरराव गोमारे, प्रमुख उपस्थितीत खा.सुधाकर श्रृंगारे, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा.ओमराजे निंबाळकर, खा.हेमंत पाटील, आ.जयदत्त क्षिरसागर, आ.अमित देशमुख, आ.बस्वराज पाटील, आ.त्र्यंबक भिसे, आ.सुधाकर भालेराव, आ.राणा जगजितसिंह पाटील, आ.विनायकराव पाटील, आ.सतीश चव्हाण, आ विक्रम काळे, आ.प्रशांत बंब,बी.बी.ठोंबरे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, तसेच तसेच सत्र पहिले साठी नागनाथण्णा निडवदे, शंकरराव नागरे, या.रा.जाधव, दि.मा.मोरे, अॅड.प्रदिप देशमुख, अॅड. नंदकुमार खंदारे, बाबूराव खोसे, दुसर्या सत्रासाठी उद्योगपतीराम भोगले,तसेच विजयअण्णा बोराडे, डॉ.सोमनाथ रोडे, के.के.पाटील, शिवाजी नरहारे, काँ दयानंद दिक्षित, त्याचबरोबर समारोपासाठी वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, प्रा.आर.एन.केंद्रे, प्रा.डॉ.विठ्ठलराव मोरे, निळकंठराव पवार आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गशर्दन व मते मांडणार आहेत. आदीसोबत मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील संघटनेचेे पदाधिकारी त्याचबरोबर आठ जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रिक केले जाणार असून मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाने ठोस पावले उचलावित या बाबतची रणनिती, तसेच कांही महत्त्वपुर्ण ठराव पारित केले जाणार आहेत.
या मराठवाड्याच्या पायाभूत विकासासाठी व ठोस रचनात्मक भूमिका ठरविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या परिषदेसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील, क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या विकास रथाला आगामी नव्याने होणार्या मराठवाड्याच्या जडणघडणीला शक्ती, बळ द्यावे, असे आवाहन या परिषदेचे स्वागताध्यक्ष/निमंत्रक लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, यांनी व संयोजन समितीच्या वतीने केले आहे.
Comments