लातूर: लातूर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक सतीश आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय जुने कार्यकर्ते सतीश आंबेकर यांची लातूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली होती. सतीश आंबेकर यांनी प्रत्येक निवडणूकीत केलेले पक्ष कार्य लक्षात घेऊन पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर यांनी लातूर जिल्हा नियोजन समितीवर सतीश आंबेकर यांची नियुक्ती व्हावी अशी शिफारस शासनाकडे केली होती त्यानुसार शासनाने लातूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. सदरील नियुक्तीचे पत्र मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेश आप्पा कराड यांची भेट घेऊन नियोजन समितीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करून सतीश आंबेकर यांनी आभार मानले. जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल आंबेकर यांचे रेणापुरचे पंस सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, जिप सदस्य सुरेश लहाने, नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, किसान आघाडीचे हनूमंतबापू नागटिळक, डॉ बाबासाहेब घुले, जिल्हा दक्षता समिती सदस्य चंद्रकांत कातळे, संगायो इंगायो रेणापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, भाजपाचे जिल्हा चिटणीस वसंत करमोडे रेणापूर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यश विजय काळे, भाजयुमो अध्यक्ष नरसिंग येलगटे, महिला आघाडीच्या ललिता कांबळे, प स गटनेते रमेश सोनवणे, सुरज शिदे, बन्सी भिसे, राजकिरण साठे, पानगावचे चेअरमन हरिकृष्ण गुरले, श्रीकृष्ण मोटेगावकर, विशाल शिगडे, भाऊसाहेब, संतोष चव्हाण, नाथराव गीते, रमाकांत फुलारी , लक्ष्मण खलग्रे, रमेश केंद्रे, अभिजित मद्दे, मारुती गालफाडे, श्रीकृष्ण पवार, श्रीमंत नागरगोजे, गोपाळ शेंडगे, माधव घुले, जलील शेख, विठ्ठल कसपटे सिध्देश्वर मामडगे, राजू आलापुरे, अंबादास राठोड यांच्यासह अनेकांनी केले आहे.
Comments