HOME   लातूर न्यूज

लातूरच्या शाश्वत पाण्यासाठी लवकरच निर्णय

तीन चार पर्यायांवर विचार, पालकमंत्री, पवारांकडून पाठपुरावा- गुरुनाथ मगे


लातूरच्या शाश्वत पाण्यासाठी लवकरच निर्णय

लातूर : महापालिकेत सत्ता नसतानाही भाजपा सरकारने लातूर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन रेल्वेने पाणीपुरवठा केला. आताही लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. लातुरला शाश्वत पाणी देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे मत नगरसेवक तथा भाजपा संघटन सरचिटणीस गुरुनाथ मागे यांनी व्यक्त केले. लातूरला कायमस्वरूपी आणि शाश्वत पाणी मिळावे यासाठी राज्यातील भाजपा सरकार प्रारंभापासूनच काम करत आहे. यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार सतत पाठपुरावा करत आहेत. लातुरला पाणी देण्यासाठी वेगवेगळ्या तीन-चार पर्यायांवर विचार केला जात आहे. उजनी प्रकल्पातून पाणी मिळविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचाही विचार केला जात आहे. लातूर शहराला पाणी देण्यासंदर्भात लवकरच पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्याचे सचिव अभिमन्यू पवार, महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत. या भेटीत होणारी चर्चा फलदायी ठरणार असून पाण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. लातूरचा पाणीप्रश्न सोडविण्यास भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे मगे यांनी म्हटले आहे. आता पाण्याच्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय होणार असल्याने कॉंग्रेसची मंडळी श्रेय लाटण्यासाठी आंदोलने करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


Comments

Top