लातूर : वीस वर्षांपासुन प्रलंबित असणारा रस्त्याचा प्रश्न युवा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी मार्गी लावला. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही करण्यात आले. पण वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी परिचित असणार्या अजित पाटील यांनी स्वतः उद्घाटन न करता याचा भागातील ज्येष्ठ महिलेला उद्घाटनाचा मान दिला. अजित पाटील कव्हेकर यांनी नगरसेवक पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून आपल्या प्रभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. काम करताना जनहित डोळ्यासमोर ठेवून खत प्रकल्प असो की वृक्षारोपण अजित पाटील यांनी स्वतःला झोकून दिले आहे.
अजित पाटील यांच्या प्रभाग क्रमांक १८ मधील माताजीनगर पाव बेकरी लाईन येथे दलित वस्तीमधील मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. यासाठी पाटील यांनी २५ लाख रुपये मंजुर करून घेतले. या कामाचे उद्घाटन ज्येष्ठ महिला मालनबाई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे कांबळे यानाही आनंद झाला. उपस्थित नागरिकही आनंदित झाले. याप्रसंगी नगरसेविका सौ. भाग्यश्रीताई शेळके, सौ सरिताताई राजगिरे, यांच्यासह सुभाषअप्पा सुलगुडले, जाफर पटेल, संजय गिर, आफ्रिन खान, महादेव पिटले, काशिनाथ पटने, सुलभा लोखंडे, श्रीमती अस्मिता वळमे, संगदिप गोखले, श्रीमती सुनिता स्वामी,सालार शेख, कैलास आंबेगावे, अमर पाटील, राहुल बिराजदार, योगेश कांबळे, राजकुमार वळगे, चंद्रकांत लोखंडे, श्रीदेवी पटने, गुरूराज मरे, सचिन काशिद, गणेश पिटले, गोविंद इर्ले, शेख सादीक, आकाश कोरे, साहेबराव आदमाने, राहूल शेटे, बिराजदार आण्णा, मिलिंद आदमाने, आकाश कांबळे, गोरे ओमकार, महादेव ढवारे, बालाजी पिटले, परमेश्वर उपाडे, श्रीमती मालन गालफाडे, श्रीमती मंदाकिनी शेटे, अजय कोटलवार यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
Comments