लातूर : विद्यार्थ्याना शाळेत प्रवेश देत असताना शिक्षक व संस्थाचालकांनी आचारसंहिता पाळावी, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती रामचंद्र तिरुके यांनी दिल्या. शाळा प्रवेशाच्या अनुषंगाने विविध संस्थाचालक, संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांच्या बैठकीत तिरुके बोलत होते. या बैठकीस शिक्षणाधिकारी (मा)औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (प्रा ) डॉ. वैशालीताई जामदार, उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, अधीक्षक राजेंद्र ढाकणे, विस्तार अधिकारी हैबतपुरे यांच्यासह संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून गोविंदराव घार, मुख्याध्यापक संघाचे सचिव चोले, साखरे यांची व्यासपीठावर उपस्थित होती. बैठकीस मार्गदर्शन करताना तिरुके म्हणाले की लातूर पॅटर्नच्या माध्यमातून आज लातूर शहर महाराष्ट्राची बरोबरी करत आहे. जिल्ह्यातील शिक्षणाच्या या पॅटर्नला अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. हे शैक्षणिक वातावरण अधिक चांगले करण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे. संस्थाचालकांनीही यात सहकार्य करावे, असे आवाहन तिरुके यांनी केले. लातूर हे शिक्षणाचे हब बनले आहे. जगाला ज्ञान देण्याची ताकद लातुरकरांच्या शिक्षणात आहे. ही ताकद अधिक वाढवण्यासाठी नामांकित संस्थानी इतर शाळांनाही सोबत घ्यावे, असे सांगून आम्ही कोणाच्याही विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या शालेय प्रवेश सुरू आहेत. या दरम्यान नियम आणि रीत समोर ठेवून संस्थाचालकांनी काम करावे. प्रवेशादरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही वर्गात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्याना प्रवेश देऊ नये. प्रवेशासंदर्भात पालकांची तक्रार येऊ नये याची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीत शिक्षणाधिकारी उकिरडे यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संघाचे सचिव चोले, संस्थाचालक गोविंदराव घार यांनी संस्थाचालकांचे विविध प्रश्न मांडले. हे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन तिरुके यांनी दिले या बैठकीस विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व प्रतिनिधींची उपस्थिती होती.
संस्थाचालकांनी पारदर्शक काम करावे
खाजगी शाळातील शिक्षक व संस्थाचालकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सदैव तत्पर आहे. जिल्हा परिषदेप्रमाणे संस्थाचालकांनीही आपल्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिका ऑनलाईन कराव्यात व त्याच्या दुय्यम प्रती त्यांना देउन आपल्या कामात अधिक पारदर्शकता आणावी. या कामात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आपल्या पाठीशी असेल अशी ग्वाही रामचंद्र तिरुके यांनी दिली.
Comments