HOME   लातूर न्यूज

आर्ट ऑफ लिव्हींगच्या वतीने लातूरात योग दिन

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह मान्यवर राहणार उपस्थित


आर्ट ऑफ लिव्हींगच्या वतीने लातूरात योग दिन

लातूर: संपूर्ण जगभरात २१ जून हा दिवस जागतीक योग दिन साजरा केला जातो. सन २०१४ पासून श्री श्री रवीशंकर यांच्या प्रेरणेतून लातूर मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून २१ जून २०१९ रोजी सकाळी ठिक ०६ ते ०८ या वेळेत लातूर येथील शाम मंगल कार्यालय सावेवाडी येथे मोठया प्रमाणात संपन्न होणार आहे. या जागतिक योग दिनास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, तहसीलदार अविनाश कांबळे, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, प्रतिभाताई पाटील कव्हेकर, हारीभाऊ काळे तसेच जिल्हयातील डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, वकील, पत्रकार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तमाम लातूरकर नागरीकांनी या विनामुल्य जागतिक योग दिनास हजर राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हींगचे जिल्हा समन्वयक कैलास जगताप, बालाजी साळूंके यांनी केले आहे.


Comments

Top