HOME   लातूर न्यूज

अनाधिकृत बांधकामे पाडणार, कर न भरल्यास जप्ती

महापौर सुरेश पवार आयुक्त एम.डी. सिंह यांनी घेतला कामकाजाचा आढावा


अनाधिकृत बांधकामे पाडणार, कर न भरल्यास जप्ती

लातूर: शहर महानगर पालिकेच्या वतीने व शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजना तसेच शहराच्या विकासाकरिता येणाऱ्या अडचणी व सध्य स्थितीमध्ये चालणारी विविध योजनेतील कामकाजाचा आढावा महापौर सुरेश पवार व आयुक्त एम. डी. सिंह यांनी महपौर यांच्या दालनात आयोजित बैठकीत घेतली, यावेळी उपमहापौर देविदास काळे हे उपस्थित होते.
लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने शहरात विविध विकास कामे सुरु आहेत त्या अनुषंगाने शहरातील केंद्र शासनाच्या वतीने सुरु असणारी अमृत पाणी पुरवठा योजनेबाबतीत शहरात सुरु असलेल्या कामाची माहिती घेण्यात आली. शहरात सुरु असलेली पाणी पुरवठ्याची सर्व कामे हि त्वरित पूर्ण करावीत, बांधकाम विभागांतर्गत सुरु असलेल्या विविध कामाची यामध्ये शादीखाना, नाट्यगृह, स्मशानभूमी आदीसह सुरु असणारे कामे इतर रस्त्यांची दुरुस्ती बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उर्वरित कामे तत्काळ करून घेण्याचे आयुक्तांनी सांगितले. करवसुली विभागामतर्गत ज्यामनी ज्यांनी अद्यापपर्यंत कर भरणा केला नाही अशा सर्व मालमत्ता धारकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरु करावी, ज्या ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला नाही अशा मालमत्ता वर जप्ती मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले. वसुली तात्काळ करून घेण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकारी यांना आयुक्तांनी व महापौरांनी केल्या. शहरातील जी अनधिकृत बांधकामे आहेत अशा बांधकामावर त्वरित कारवाई सुरु करावी व ही बांधकामे पाडावीत अशा सूचना केल्या, या आधी अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्या करिता आवाहन करण्यात आले होते व जे बांधकाम अनाधीकृत आहे अशाना नोटीसही देण्यात आली होती. तरी ज्यांनी आपली बांधकामे अधिकृत करून घेतली नाही अशांना नोटीस देऊन बांधकाम पाडण्यात येईल असे सांगितले. स्वच्छता विभागामार्फत वरवंटी कचरा डेपो येथे साचलेल्या कचर्‍यावर सुरु असलेली प्रक्रिया मोठ्या प्रमाणात व चांगल्या पद्धतीने सुरु आहे, त्याची गती वाढवून लवकरात लवकर त्या ठिकाणी साचलेला कचर्‍यावर प्रक्रिया करून परिसर स्वच्छ करावा. रस्त्यावर कोणत्याही प्रकराचा कचरा पडू नये पडल्यास तो त्वरित साफ करून घ्यावा असे सांगितले. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील सर्व मोठे छोटे नाले सफाई करण्याचे महापौर यांनी आदेश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतून लवकरच लातूर शहरामध्ये एकही व्यक्ती घरापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करून कार्य पूर्ण करावे, मनपाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळेचा दर्जा वाढविण्या करिता प्रयत्न करावेत, मनपातील सर्व शाळा संगणीकृत करून घ्याव्यात असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी उपायुक्त संभाजी वाघमारे, सहाय्यक आयुक्त शेला डाके, उज्ज्वला शिंदे, शहर अभियंता दिलीप चिद्रे, कलप्पा बामनकर, प्रभाकर डाके, समीर मुलाणी, महेश पाटील, चंद्रकांत तोडकर, संजय कुलकर्णी, आस्थपना प्रमुख रमाकांत पिडग्र, रुक्मानंद वडगावे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


Comments

Top