लातूर: औसा शहरासह तालुक्यातील मोठे गाव म्हणून परिचित असणारे लामजाना तसेच सीमावर्ती भागातील कासारशिरसी या तीन ठिकाणच्या बसस्थानकाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बसस्थानकाच्या कामांसाठी जवळपास १२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून लवकरच या तीनही कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमान्यू पवार यांनी दिली. पवार यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता. अभिमन्यू पवार यांच्यामुळे या भागातील रस्ते व विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असून अनेक ठिकाणच्या बंद पडलेल्या पाणीयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मतदारसंघात दळणवळणाच्या सोयी केल्या जात असून मोठा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सोयी सुविधा देताना नागरिकांना प्रवास सुखकर वहावा यासाठी औसा, लामजना आणि कासारशिरसी या तीन ठिकाणी नव्या बसस्थानकाची आवश्यकता असल्याचे पवार यांच्या लक्षात आले होते.
औसा हे तालुक्याचे ठिकाण असून सध्या असणारे बसस्थानक अपुरे पडत आहे. वाढती प्रवाशांची संख्या पाहता सर्व सोयींनी युक्त नवया स्थानकाची गरज होती. लामजाना येथेही जुने स्थानक असले तरी त्याची अवस्था चांगली नव्हती. कासारशिरसी येथून परराराज्यात वाहतूक होते. महाराष्ट्रासह कर्नाटकातील प्रवासी येथून दैनंदिन प्रवास करतात. पण त्यामानाने तेथील बसस्थानक सोयीचे नव्हते. या भागाचा दौरा करताना अभिमन्यू पवार यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधून या बसस्थानकांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावा केला होता. औसा मतदारसंघात जे जे हवे ते देण्यासाठी पवार यांनी अधिकार्याशीही संपर्क ठेवला होता. यातूनच काही दिवसांपूर्वी या तीनही स्थानकांच्या कामांना तांत्रिक मान्यता मिळाली. प्रशासकीय मान्यतेनुसार औसा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ३२ लाख ७० हजार ९०० रुपये, लामजना बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी २ कोटी ४ लाख ६८ हजार २०० रुपये तर कासारशिरसी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठे ४ कोटी, ५१ लाख ८ हजार ९०० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बसस्थानकाची इमारत, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत काम, आग प्रतिबंधक व्यवस्था, वाहनतळावर काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, आरसीसी गटार बांधकाम आदी कामे केली जाणार आहेत.
Comments