HOME   लातूर न्यूज

सोमाणी शाळेत गुणवंतांचा सत्कार

प्रोत्साहन पत्र, पुस्तके आणि रोपांचे वितरण


सोमाणी शाळेत गुणवंतांचा सत्कार

लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील दहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच प्रोत्साहन पत्र, पुस्तक व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव व सन्मान सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, उपाध्यक्ष तेजमल बोरा, प्रकाश कासट, सचिव
कमलकिशोर अग्रवाल, सहसचिव सुभाष कासले , कोषाध्यक्ष जयेश बजाज, डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमाणी विद्यालयाच्या ३७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १३ आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ४ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पेढा भरवून , पुस्तक आणि रोपटे भेट भेट देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानसोहळ्यात रोपटे भेट देण्याचा उद्देश हाच होता की, विद्यार्थांना आपल्या शाळेची आठवण राहावी आणि त्याच्याकडून पर्यावरणाचा योग्य समतोल साधला जावा. कारण भावी पिढीच्या हातातच पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याची जबाबदारी आहे. श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या यशाचा आलेख सातत्याने कायमस्वरूपी उंचावत राहिलेला आहे. यावर्षीही विद्यालयाचा दहावीचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे शंभर टक्के राहिला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतही या विद्यालयाच्या
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगांवकर यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वतः प्रयत्न करावा आणि इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल,डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक योगदिनाचे औचित्य साधून योगगुरू सुरभी बजाज यांनी विद्यार्थ्यांना योगाविषयी माहिती देऊन योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, सुनीता बजाज, संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
परिश्रम घेतले.


Comments

Top