लातूर: आगामी आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आळंदी येथून पंढरपूर येथे निघणार्या संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीचा पायी दिंडी वारीची सुरूवात झालेली असून या दिंडीतील सर्व वारकरी व भाविक भक्तांना लातूरचे नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वतीने मोफत टँकरने १८ दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचा शुभारंभ नुकताच ह.भ.प. त्र्यंबक महाराज अंबुलगेकर (पंढरपूर) यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या पुणे-आळंदी येथून पायी निघणार्या वारकर्यांच्या पंढरपूर वारीची रूपरेषा मार्ग निश्चित करण्यात आलेला असून या दिंडीतील वारकर्यांसाठी कायमस्वरूपी सोबत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्रत्येक ठिकाणी होणार्या थांब्याच्या ठिकाणीही नगरसेवक कव्हेकरांच्या मार्फत सर्व भाविकांना मोफत १८ दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत हांडे यांनी दिली आहे.
Comments