HOME   लातूर न्यूज

एक घंटा सेहत के लिये,एक घंटा देश के लिये...

जेष्ठ सामाजिक नेते डॉ एसएन सुब्बाराव यांच्या हस्ते वृक्षारोपण


एक घंटा सेहत के लिये,एक घंटा देश के लिये...

लातूर: लातूर वृक्ष चळवळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक भागातील एसटी डेपो आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमास ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. एसएन सुब्बारावजी यांनी भेट देऊन त्यांनी स्वतः वडाच्या झाडाचे रोपण राज्य परिवहन महामंडळ लातूर आगार आवारात करून ‘एक घंटा सेहत के लिये ,एक घंटा देश के लिये’ असा संदेश सर्वाना दिला.
वयाची नव्वदी गाठलेले आणि मनाने चीरतरुण असणारे थोर समाजसेवक, संपूर्ण भारतातल्या नवतरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे बीजारोपण करणारे आदरणीय भाईजी अशी जेष्ठ गांधीवादी नेते एसएन .सुब्बारावजी यांची ओळख आहे. जेष्ठ गांधीवादी नेते एसएन सुब्बाराव यांच्या हस्ते पार पडलेले वडाच्या झाडाचे रोपण हा एक मोठा योगायोग. हा वटवृक्ष ऑक्सिजन सोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देईल अशा शब्दात लातूर वृक्षच्या सदस्यांनी यावेळी आपलया भावना व्यक्त केल्या. लातूर वृक्षने गेल्या १९ जून २०१९ रोजी सुरू केलेल्या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असून ६ ते ८ फूट उंचीचे रोपटे दान करणाऱ्यांची तसेच श्रमदानास येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लातूर शहरातील शिवाजी चौकात वाहनांची संख्या अधिक असून परिणामी प्रदूषणही जास्त आहे. ज्यामुळे या ठिकाणी जास्त वृक्षांची संख्या वाढावी या उद्देशाने वृक्षारोपण केले जात आहे. यावेळी लातूर वृक्षचे सुपर्ण जगताप, डॉ. गणेश पन्हाळे, माधव बावगे, वैजनाथ कोरे, शरद दाताळ, नगरसेवक इमरान सय्यद, अॅड जगन्नाथ चिताडे, सातपुते सर, अनिल दरेकर, कपिल धावारे, विशाल थोरमोटे, ज्ञानेश्वर मरे, अरूण केंद्रे, क्षीरसागर सचिन, डॉ. बीआर पाटील, विशाल बरुरे, संतोष नकाते, लांडगे कालिदास, उत्पल पुलकुर्ते, योगेश स्वामी, यशवंत कानतोडे, प्रशांत मादारपल्ले, माणिक वैद्य, तेजस दिक्षित, इमरान सय्यद, प्रदीप पाटील, शुभम पांचाळ, अभिजित तिळकरी, शुभम दुधाळे, प्रकाश शेंडकर, प्रसाद पालसेवार उपस्थित होते.


Comments

Top