लातूर: लातूर येथील मांजरा परीवारातील साखर कारखान्या सोबत शाश्वत ऊस विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलंड येथील शुगरकेन सॉलीडरीडॅड व आरसीएफ कंपनी सहभागी कंपनी म्हणून काम करणार आहे. या अनुषंगाने या संस्थेचे सल्लागार डॉ. आर. पी. सिंग आणि डॉ. अलोक पांडे यांनी भेट देवून परीसराची पाहणी केली, सेंद्रीय ऊस उत्पादकांसोबत चर्चा केली केली. यांनतर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत ऊस विकास करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विलास कारखाना उभारणी पासूनच्या वाटचालीची माहीती घेवून कामाचे कौतुक केले.
हॉलंड येथील शुगरकेन सॉलीडरीडॅड ही आंतरराष्ट्रीय संस्था ५९ देशात काम करीत आहे. ही संस्था जगभरात मुख्यत्वे शाश्वत ऊसविकासासाठी कार्यरत आहे. शाश्वत ऊसवीकास करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्याची भूमिका ही संस्था घेते. याकरीता त्यांच्याकडे शास्त्र्ज्ञ, ऊसतज्ज्ञ, जलतज्ञ आणि मृदातज्ञ उपलब्ध आहेत. तर संबंधित संस्थाना मदत करण्यासाठी ऊस विकास निधीची तरतूद देखील त्यांच्याकडे आहे.
या कारखान्याच्या परिसरात शाश्वत ऊस विकासात काम करण्यासाठी शुगरकेन सॉलीडरीडॅड या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सल्लागार डॉ. आर. पी. सिंग आणि डॉ. अलोक पांडे यांनी २३ जून रोजी लातूर येथे भेट देवून मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळी व नव्याने उभारणी होत असलेल्या ट्वेन्टिवन शुगर इंडस्ट्रिज कारखान्यास भेट देवून पाहणी केली. सेंद्रीय ऊसउत्पादक शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांच्या सोबत चर्चा केली. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस प्रक्षेत्रास भेट दिली. येथील परीसराचा अभ्यास करून समाधान व्यक्त केले. यानंतर बाभळगाव येथे चेअरमन वैशाली देशमुख व जिल्हा परिषद सदस्य धीरज विलासराव देशमुख यांची भेट घेवून या विषयावर त्यांच्याशी चर्चा करून मांजरा परिवारातील कारखान्यासाठी शुगरकेन सॉलीडरीडॅड व आरसीएफ कंपनीच्या माध्यमातून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. येथील शेतकऱ्यांना शाश्वत ऊसविकास करण्यासाठी शुगरकेन सॉलीडरीडॅडच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संस्था उपलब्ध होणार आहे.
Comments