HOME   लातूर न्यूज

जिल्हयात १२७ मिमी पावसाची नोंद

सर्वात जास्त रेणापुरात, सर्वात कमी निलंग्यात, देवणीत थेंबही नाही!


जिल्हयात १२७ मिमी पावसाची नोंद

लातूर: जिल्हयात दिनांक २५ जून २०१९ रोजी सकाळी ०८ वाजेपर्यंत एकूण १२७ मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्हयाची पावसाची सरासरी ही १२.८० इतकी आहे. तर आजपर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या ०८.३९ टक्के इतका असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हयात २५ जूनपर्यंत झालेले तालुकानिहाय पर्जन्यमान याप्रमाणे;
लातूर २०.६३, औसा ०४.४३, रेणापूर ४०.५०, अहमदपूर १३.३३, चाकूर १२.००, उदगीर ०३.३७, जळकोट ३०.००, निलंगा ०१.५०, देवणी ०.०० व शिरुर अनंतपाळ ०२.०० मिलीमिटर. जिल्हयाच्या १० तालुक्यातील पावसाचे प्रमाण १२७.०६ मिलीमीअर इतके असून त्याची एकूण सरासरी १२.८० मिमी इतकी आहे. लातूर जिल्हयाची ०१ जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ८०२.१३ मिमी इतकी असून आजपर्यंत झालेला पाऊस ६७.२६ मिमी इतका आहे. हे प्रमाण जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या ०८.३९ टक्के इतके आहे. जिल्हयात सर्वात जास्त पाऊस रेणापूर तालुक्यात ४०.५० मिमी तर सर्वात कमी पाऊस निलंगा तालुक्यात ०१.५० मि.मी. इतका झाला. तर देवणी तालुक्यात पाऊस झाला नाही.


Comments

Top