HOME   लातूर न्यूज

भाजपा सदस्यता नोंदणी जिल्हा प्रमुखपदी अरविंद पाटील

भाजपाच्या मुंबईतील कार्यकारिणीच्या बैठकीत निवड


भाजपा सदस्यता नोंदणी जिल्हा प्रमुखपदी अरविंद पाटील

लातूर: लातूर जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी प्रमुखपदी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे ‘वसंत स्मृती’ या भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्षाने संघटनपर्व २०१९ सुरू केले आहे. याअंतर्गत संपूर्ण देशात भाजपाच्या सदस्यांची नोंदणी करण्यात येणार असून विशेषतः ज्या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यात ही नोंदणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. लवकरच महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक होऊ घातल्याने या पार्श्‍वभूमीवरच मुंबईत नुकतीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असून या बैठकीत आगामी पक्ष बांधणीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच सदस्य नोंदणीसाठी अभिमयान राबविण्याच्या सूचनाही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. या बैठकीत लातूर जिल्हा भाजपा सदस्य नोंदणीप्रमुख म्हणून अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली.
युवा नेते अरविंद पाटील हे जिल्ह्यात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची सावली म्हणून ओळखले जातात. पालकमंत्री मंत्रीपदाच्या कामात व्यस्त असताना जिह्यात पक्षाच्या कामावर व संघटन बांधणीवर अरविंद पाटील यांचे पूर्ण लक्ष असते. लोकसभा निवडणुकीतही अरविंद पाटील यांच्याच नियोजनात प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. पक्ष संघटनेवर त्यांची चांगली पकड असून गावोगावच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. या बाबींची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. सदर निवड झाल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या जो विश्‍वास दर्शविला आहे, तो सार्थ ठरवत पक्ष सदस्य नोंदणीत लातूर पॅटर्न निर्माण करू, अशी ग्वाही दिली आहे. या निवडीबद्दल अरविंद पाटील यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहेत.


Comments

Top