लातूर: लातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार इंद्रजित गरड याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हा प्रकार तहसील संकुलातच घडला. गंगापूर येथे खरेदी केलेल्या जमीन प्रकरणी निकाल देऊन या जमिनीचा फेर ओढून देण्यासाठी गरड यांनी ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. यातले १५ हजार रुपये गरड यांनी पंचासमक्ष स्विकारले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कुमार दराडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक संजय लाटकर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उप अधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याची रचना करण्यात आली. लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, शिवकांता शेळके, सचिन धारेकर, दत्ता विभुते, आशिष क्षिरसागर, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, रुपाली भोसले, राजू महाजन यांनी हा सापळा यशस्वी केला.
Comments