लातूर: लातूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासकीय इमारत येथील डीपीडीसी हॉल येथे मान्सूननपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व तालुका स्तरीय अधिकारी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक, तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पूर्व सूचना सर्व यंत्रणेनिहाय कामाचे स्वरुप सांगण्यात आले. सर्व गाव पातळीवरील कर्मचारी यांची नेमून दिलेल्या गावअंतर्गत मुक्कामी राहुन आपत्तीमध्ये घडणाऱ्या घटनेबाबत २४ तास सतर्क राहून वेळोवेळी अहवाल या कार्यालयास व वरीष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश तहसीलदार अविनाश कांबळे यांनी दिले.
तहसील कार्यालय लातूर येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापित करण्यात आलेला असून आपत्ती व्यवस्थापन कक्षातील भ्रमणध्वनी क्रमांक 02382-242962 असा आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक प्रमुख निवासी नायब तहसिलदार व बालाजी आंब्रे पाटील, कक्ष प्रमुखाचे सहाय्यक पत्रिके एसयू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे २४ कार्यरत ठेवण्यात आले असून पर्जन्यमानाची व नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत गावपातळीवरील कर्मचारी हे तहसील कार्यालयातील आपत्कालीन कक्षात संपर्क साधून त्याची नोंद करणे आवश्यक आहे. एखाद्या गावात आपत्ती उद्भवल्यास गावपातळीवरील कर्मचारी, तलाठी, कृषीसहाय्यक ग्रामसेवक यांना माहिती देण्यात यावी. ही माहिती गाव पातळीवरील कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. तसेच सर्व नागरिकांनी आपत्ती बाबत नियंत्रण कक्षात माहिती दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments