लातूर: विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव येथील शेतात एकरी २०० मे.टन ऊस उत्पादनांच्या प्रयोगाचा मान्यवरांच्या हस्ते ऊस लागवड करून करण्यात आला. हा प्रयोग लातूर जिल्हा व परिसरातील ऊस शेतीला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. या वेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी चेअरमन एस.आर.देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, जयसिंहराव देशमुख, नाथसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांची प्रमख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाभळगाव येथील शेतात ०.६० आर क्षेत्रात को ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड करण्यात आली. ठिबक व फॉगर ही सिंचन पद्धत अवलंबिण्यात आली आहे. २ सरीतील अंतर ५ फूट, ऊस लागवड रोपाने करून २ रोपातील अंतर २ फूट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, विशेष ऊसतज्ज्ञ एस. बी. माने, ऊस विकास अधिकारी डी. एस. कदम यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या वेळी बोलताना विशेष ऊसतज्ज्ञ एस .बी. माने यांनी उसाच्या हवामान शास्त्राविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, रवि काळे, चंद्रकांत टेकाळे, वलायतखाँ पठाण, जयचंद भिसे, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, बालाजी साळुके, जगदीश चोरमले, भारत आदमाने, प्राचार्य हेमंत पाटील, कार्यकारी संचालक बारबोले, जागृती शुगरचे संचालक संभाजी रेड्डी, शेतकी अधिकारी कल्याणकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments