लातूर : येथील रहिवासी महेश ममदापुरे आणि पूजा झुंजारे यांनी आपला विवाह सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या नव दाम्पत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात वृक्षारोपण या कार्याने करून एक आदर्श निर्माण केला आहे. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वसुंधरा प्रतिष्ठानचे सदस्य असलेले महेश ममदापुरे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात वृक्षारोपण या कार्याने करून वृक्ष संवर्धनसाठी पुढाकार घेण्याची शपथ घेतली आहे. लातुरातील कातपुर रोडवरील संत नरहरी महाराज मंदिर येथे महेश आणि पूजा हे विवाह बंधनात अडकले. त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात अनोख्या पध्दतीने करून एक नवा आदर्श निर्माण करीत वृक्षारोपणसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. केवळ वृक्षारोपण न करता वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची या नवं दाम्पत्याने शपथ घेतली. या पर्यावरण पूरक विवाह सोहळ्यास वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, जिल्हा सचिव रामेश्वर बावळे, लातूर कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य प्रशांत स्वामी यांच्यासह नागरिक, ममदापुरे आणि झुंजारे परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्यातून सर्वांनी बोध घेऊन एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments