HOME   लातूर न्यूज

मुस्लिमांच्या माँबलिचिंग विरोधात धरणे अंदोलन

मुस्लीम अ‍ॅट्रॉसिटी कायदा करा, सामुहिक हल्ले रोखा


मुस्लिमांच्या माँबलिचिंग विरोधात धरणे अंदोलन

लातूर : भारतात चालू असलेल्या मुस्लिमांच्या माँबलिचिंग संदर्भात तात्काळ दखल घेऊन संसदेत मुस्लिम अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट संसदेत संमत करावा. मुस्लिमांवर होत असलेले सामुहिक हल्ले रोखावेत या मागणीसाठी मुस्लीम बांधवांनी लातुरच्या गांधी चौकात धरणे आंदोलन केले. माँबलिचिंग दादरिचे अखलाख, राजस्थानचे पहलूखान तसेच अफराजूल आणि वल्लभगडच्या जुनैद पर्यंत ही माँबलिचिंग चालूच आहे. एकट्याने फिरत असलेल्या मुस्लिमांना १०० ते २०० जणांचा जमाव गाठून सामुहिक जयश्रीराम, जय हनुमानच्या घोषणा देऊन मुस्लिमांना जिवे मारत आहेत. यामुळे मुस्लिम समुदायामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाच दिवस अगोदर भाजपची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये तबरेज अन्सारी या चोवीस वर्षीय युवकाचा प्पपू मंडल व त्याच्या साथीदाराने हल्ला करून त्याचा खून केला. रात्रभर त्याला खांबाला बांधून मारण्यात आले. त्याला दवाखान्यात न घेऊन जाता सरळ जेलमध्ये पाठवण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. झुंडीने केलेल्या या हल्यामध्ये हकनाक मुस्लिमांचा बळी गेला. हे फक्त मुस्लिम अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट नसल्यामुले होत आहे. या सदर्भात त्वरित मुस्लिम अँटृसिटी अँक्ट तयार करुन पूर्ण देशभर लागू करण्यात यावा. तबरेस अन्सारीच्या विधवा पत्नीस रू पन्नास लाखांची मदत देण्यात यावी. या माँबलिचिंग प्रकरणातील आरोपींची प्रकरणे फास्ट कोर्टात चालवून त्वरित खटले निकाली काढण्यात येवून आरोपींना शिक्षा करण्यात यावी. या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी हलगर्जी पणा केला आहे अशा पोलिस, न्यायालय यातील व्यक्तींवर निलंबनाची कार्यवाई करून शिक्षा करण्यात यावी. तबरेस अन्सारीचे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी सर्व समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी डाँ. ताहेर शेख, अँड लालासाहेब शेख, इस्माईल फुलारी, अँड मुस्ताक सोदागर, मोहसीन खान, प्रा खय्युम शेख, वाजीद मणियार सय्यद जाकेर, सत्तार शेख, अली मोहम्मद शेख, इरफान शेख, मंहमद गोस सय्यद, शादूल शेखउपस्थित होते.


Comments

Top