HOME   लातूर न्यूज

डॉक्टर-जानाईश्री पुरस्कार डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांना जाहीर

सात जुलै रोजी पारिजात मंगल कार्यालयात होणार पुरस्कार प्रदान


डॉक्टर-जानाईश्री पुरस्कार डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांना जाहीर

लातूर: श्री जानाई प्रतिष्ठान लातूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०१९ चा ‘डॉक्टर-जानाईश्री’ पुरस्कार लातूर येथील जेष्ठ नेत्ररोग तज्ञ, ममता हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांना त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजीक, अध्यात्मीक व सहकार क्षेत्रातील नि:स्वार्थ सेवेबद्दल रोजी जाहीर करण्यात आला आहे.
२५,००० रोख, मानपत्र, महावस्त्र, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार ०७ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०६ वाजता पारिजात मंगल कार्यालय लातूर येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे. भागवत कथाकार ह. भ. प. पद्मनाभ व्यास महाराज याच्या हस्ते डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांना हा पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद लातूर मधील जेष्ठ वैद्य डॉ. बी. आर. पाटील भूषवणार आहेत. डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून १९६२ साली एमबीबीएस व मुंबई येथुन डी ओ. एम. एल ( नेत्र विशारद ) हे शिक्षणपुर्ण केल्या नंतर नळदुर्ग, लातूर, औरगाबाद, जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे शासकिय वैद्यकिय अधिकारी म्हणून यशस्वी रूग्णसेवा केली. आपल्या वैद्यकिय सेवेत वयक्तीक ३२००० च्या वर नेत्र शस्त्रक्रीया केल्या व रूग्णांना दृष्टी दिली. त्याबद्दल त्यांना सरकारच्या वतीने १९८५ साली पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ५५ वर्षांच्या वैद्यकीय कार्याकाळामध्ये वैद्यकीय तत्वाशी तडजोड न करता लातूर येथील ममता हॉस्पिटलच्या माध्यमातून रूग्णांची सेवा केली. अतिशय मागासलेला कंबोडीया या देशामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून महिना, महिना राहुन नेत्रशिबीरे घेवून हजारो रूग्णाला दृष्टी दिली.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. अभिजीत मुगळीकर, सचिव डॉ. पंकज तेरकर, कार्याध्यक्ष राजेश मित्तल, जानाई विद्यार्थी मंडळ अध्यक्षा कांचन इस्लामपूरे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल ठोंबरे, संजय प्र अयाचीत, अर्किटेक्ट विजय सहदेव, प्रसाद उदगीरकर, महेश औरादे, डॉ. ऋजुता अयाचित, जानाई महिलापत संस्थेच्या सौ. पूजा कांबळे, श्री. गुरूजी आय टी आयचे भूषण दाते, जानाई बचतगट अध्यक्ष डी. बी. पाठक, अमोल तांदळे, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. पी. के. शहा, डॉ. मनोज शिरूरे यांनी केले आहे.


Comments

Top