HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्याला लावायचीत पाच कोटी झाडे!

हरित महाराष्ट्रासाठी यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट!


लातूर जिल्ह्याला लावायचीत पाच कोटी झाडे!

लातूर: हरित महाराष्ट्र करण्यासाठी 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसोबतच लोकांचाही सहभाग राहणार आहे. टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्याचे संगोपनही गरजेचे आहे. मराठवाड्यासाठी 9 कोटी 28 लक्ष 43 हजार 150 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हानिहाय उद्दिष्ट पुढीलप्रमाणे; औरंगाबाद-1,11,38,450, बीड-1,21,77,350, हिंगोली-1,01,38,700, जालना- 1,05,67,450, लातूर-1,08,11,850, नांदेड-1,60,20,400, उस्मानाबाद-97,81,200, परभणी-1,22,07,750. विभागात 17 लक्ष 72 हजार 102 इतकी हरित सेना नोंदणी झाली आहे. जिल्हानिहाय 26 जून 2019 पर्यंत 'हरित सेना' नोंदणीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. उस्मानाबाद-4,05,598, लातूर-5,17,442, बीड-3,59,464, हिंगोली-97,704, नांदेड-1,38,253, औरंगाबाद-1,37,943, जालना-61,773, परभणी-53,925.
वृक्षारोपण मोहिमेसोबत लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामाजिक उद्देश समोर ठेवून मुलीच्या जन्माचे स्वागत करताना कन्या वन समृध्दी योजनेच्या माध्यमातून दहा झाडे देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. यापैकी पाच झाडे ही सागाची तर पाच झाडे ही फळवृक्षांची आहे. बांबुचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांबु मिशन राबविण्यात येत आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास वनयुक्त शिवाराची जोड दिल्याने वनक्षेत्रातील जलसाठे 432 चौ.कि.मी. ने विस्तारले आहे. ज्या भागात वनक्षेत्रे कमी आहेत तेथे शासनामार्फत विशेष योजना देण्यात येणार असून या माध्यमातून वनशेती व त्यादृष्टीने रोजगार वाढविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.


Comments

Top