लातूर: शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस प्रभाग १८ मधून महपौर सुरेश पवार व मनपा आयुक्त एमडी सिंह यांच्या शुभहस्ते वृक्ष लावून करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती दीपक मठपती, सभागृह नेते शेलेश गोजमगुंडे, नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, सरिता राजगिरे व भाग्यश्री शेळके उपस्थित होते.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना महापौर सुरेश पवार यांनी उपस्थित प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावण्याची जबाबदारी घ्यावी व इतरानाही आपल्यासोबत सहभागी करून घ्यावे असे सांगितले. आयुक्त एमडी सिंह यांनी शहरात राहणार्यांनी शहरासोबत आपल्या गावीही पुढाकार घेऊन वृक्ष लागवड करावी जेणे करून पर्यावरनाचा समतोल राखला जाईल असे आवाहन केले. स्थायी समिती सभापती दीपक मठपती व शेलेश गोजमगुंडे यांनी शुभेछा देऊन वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगितले. शासनाने सन २०१९-२० साठी ०१ लाख झाडे लावण्याचे उदिष्ट लातूर शहराला दिलेले आहे. ही झाडे ०१ जुलै ते ३० सप्टेंबर या ०३ महिन्याच्या कालावधीत लावण्यात येणार आहेत. ही झाडे शहरातील उदयानामध्ये तसेच रस्त्याच्या बाजुने लावण्याचे नियोजन केले आहे. मुख्य रस्त्यांवर देखील लावण्यात येणार आहेत. या वृक्ष लागवडीमध्ये लातूर शहरातील नागरिकांनी, व्यापार्यांनी, शाळा, तरुण मंडळे इतर संस्थांनी आपला सहभाग नोंदवावा जेणे करून आपले लातूर शहर हरित व सुंदर लातूर होईल असे आवाहन लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास शहर अभियंता दिलीप चिद्रे, लेखा विभाग प्रमुख प्रभाकर डाके, अभियंता एसएन काझी, क्षेत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी समीर मुलाणी, स्वच्छता निरीक्षक शेख अक्रम, प्रभाग १८ मधील जेष्ठ नागरिक जाफर पटेल, अशोक कांबळे, नीलकंठ पवार, संध्या पौळ, अमर पाटील, ब्रम्हानंद स्वामी, संजय गीर तसेच महाराष्ट्र विद्यालयातील सर्व विध्यार्थी व शिक्षक, कर्मचारीवृंद यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग १८ चे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालिब यांनी केले.
Comments