लातूर: सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने वादळी वारा, पाऊस आणि इतर नैसर्गीक संकटाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी प्रभावित वीज व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या प्रचलित संपर्क केंद्रांसह जिल्हयाच्या ठिकाणी असणाऱ्या डीएसएस केंद्रांशी तसेच कार्यकारी अभियंता प्रशासन यांच्याशी संपर्क
साधण्याचे महावितरणचे मुख्य अभियंता श्री. आर. आर. कांबळे यांनी कळविले आहे.
ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी महावितरणने विजेसंबंधीच्या तक्रारीसाठी 180023333435 किंवा 18001023435 तसेच 1912 या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध करुन दिली आहेत. ही सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. त्या शिवाय, ग्राहकांना किंवा नागरिकांना खंडित वीज पुरवठा, वीज अपघात तसेच वीज वाहिण्यावर झाडांच्या फांदया तुटून पडणे किंवा
विजेसंबंधीच्या तक्रारीसाठी लातूर परिमंडलातील लातूर जिल्हयातील ग्राहकांसाठी लातूर डीएसएस कंट्रोल रुम- 7875762021, कार्यकारी अभियंता प्रशासन – 7875762079, उस्मानाबादसाठी डीएसएस कंट्रोल रुम-7875211615 कार्यकारी अभियंता प्रशासन – 7875762014 तर बीड जिल्हयासाठी डीएसएस कंट्रोल रुम- 7875176464 कार्यकारी अभियंता प्रशासन बीडसाठी 7875762007 या क्रमांकावर संपर्क साधावा. या माध्यमातून ग्राहकांच्या प्राप्त तक्रारी संबंधित अधिकारी आणि डीएसएस कंट्रोल रुममधून संबंधित क्षेत्रिय अधिकारी- कर्मचाऱ्यांना कळवून ग्राहक समस्या सोडविण्यास मदत होवू शकते.
Comments