लातू: लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक आज गुरुवार ११ जुलै २०१९ रोजी दुपारी ०२ वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच साखर कारखाने, सहकारी बँका, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य यांची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी ०२ वाजता होणाऱ्या या बैठकीस काँग्रेस पक्षाच्या, महिला काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेस, लातूर तालुका काँग्रेस एनएसयुआय व इतर विविध सेलचे पदाधिकारी, नियुक्त केलेले निरीक्षक, समन्वयक यांनीही उपस्थित रहावे असे आवाहन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी केले आहे.
Comments