HOME   लातूर न्यूज

वारकरी कुस्ती महावीर किताबाचे निवृत्ती बोऱ्हाडे मानकरी

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे आयोजित स्पर्धा


वारकरी कुस्ती महावीर किताबाचे निवृत्ती बोऱ्हाडे मानकरी

लातूर: ५५ ते ६५ वयोगटातील नाशिक येथील निवृत्ती बोऱ्हाडे -(वारकरी महावीर), ७० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मांडवडारी येथील बळीराम बहिरवाळ (ज्येष्ठ वारकरी महावीर) तर १६ ते २५ वयोगटातील नांदेड येथील भास्‍कर कदम-(कुमार वारकरी महावीर) हे यंदाच्या श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले.
मानाचा फेटा, माऊलींची-जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रक्कम व चांदीची तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, अमरावती, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नाशिक, लातूर व कर्नाटक येथील २०० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांती गुरुकुल वाखरी पालखी तळाच्या शेजारी, पंढरपूर येथे वारकरी भाविकभक्तांचेसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून श्री समर्थ विष्णूदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा १० जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी जेष्ठ संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, मराठी साहित्‍य सम्‍मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, श्री स्‍वामी समर्थ अन्न छत्र मंडळ ट्रस्‍ट अक्‍कलकोटचे संस्‍थापक अध्यक्ष जन्‍मेजयराजे भोसले, महान भारत केसरी पै. दादू चौगुले, हिंद केसरी, पै. हिंद केसरी पै. दीनानाथ सिंग, नंदू विभूते, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, संस्‍कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, माजी खासदार नानासाहेब नवले, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, के.के. झा, रूई रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितिचे विश्वस्त श्रीकांत देशमुख, संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे, आणि डॉ,पी.जी. धनवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन किसन बुचडे यांनी केले. शंकरअण्णा पुजारी यांनी या स्पर्धेचे धावते वर्णन केले. तर विलास कथुरे यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.


Comments

Top