औसा: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान व संतोषप्पा मुक्ता मित्रमंडळाच्या वतीने एस.टी. बसची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षीच्या मोफत बससेवेतून १२२ भाविक पंढरपूरला रवाना झाले आहेत. औसा येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान व संतोषप्पा मुक्ता मित्रमंडळाच्या वतीने औसा तालुक्यातील भाविकांसाठी गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. यावर्षी भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी, पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता, नगरसेवक सुनिल उटगे, सराफ असोशिएशनचे अध्यक्ष सतीश नाईक, शिवसेनेचे औसा शहर प्रमुख सुरेश भुरे, आगार व्यवस्थापक पांडूरंग पाटील, प्रतिष्ठानचे सचिव संजय सगरे, आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाविकांना ओळखपञ देण्यात आले. वारक-यांना मोफत बससेवेचा व्यवस्था करणाऱ्या विघ्नहर्ता प्रतिष्ठान व संतोषप्पा मुक्ता मित्रमंडळाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. व सर्व वारक-यांना मोफत चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात केली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी काशिनाथ सगरे, विनायक मोरे, रमेश दुरुगकर, राम कांबळे, मुक्तेश्वर पडसलगे, शमशुल काझी, किशोर जाधव, गिरीधर जंगाले, सुमित शिंदे, शिवाजी मोरे, महेश उस्तूरे, विजय बिराजदार, देविदास सुरवसे, अरुण कुलकर्णी, वाहतूक नियंत्रक पवार मल्लिकार्जुन निगुडगे, ज्ञ्रुत्रिक आपसिंगेकर, आदीनी प्रयत्न केले आहेत.
Comments