लातूर: माजी स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून प्रभाग ०५ मधील माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालय, लेबर कॉलनी परिसरातील ग्रीन बेल्ट येथे लातूर शहरात प्रथमच ‘मियावाकी पद्धतीने’ वृक्षारोपण करण्यात आले. मनपा आयुक्त एम. देवेंद्र सिंह यांनी श्रमदान करीत वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, सौ पूजा पंचाक्षरी, डॉ. फरजाना बागवान, गौरव काथवटे यांच्यासह डॉ वाघमारे, डॉ अलगुले, मनपाचे प्रभाकर डाके, प्रेमानंद घंटे, समाधान सूर्यवंशी, मुनीर शेख, अकबर शेख, खाजामिंया शेख, खय्युम बोरीकर, सुभाष पंचाक्षरी, हमिदपाशा बागवान, यशपाल कांबळे, राहुल डूमने, विशाल चामे, राम गोरड, जय ढगे, राम सूर्यवंशी, अजमल शेख, अतिक शेख, युनूस शेख, प्रवीण भवाळ, शाहबाज पठाण, इम्तियाज शेख, निलेश वाघमारे, आशिष साठे, मोहसीन सय्यद, सूर्यकांत काळे, महादेव धावारे, मुस्तकिम पटेल, कमलाकर सुरवसे यांनीही श्रमदान करीत वृक्षारोपण केले.
जपानचे ख्यातनाम वनस्पतीशास्त्र संशोधक अकिरा मियावाकी यांनी संशोधित केलेल्या पद्धती नुसार ०१ चौ. मी. जागेत ०३ वृक्षांची लागवड केली जाते, यामध्ये झुडपे, मध्यम आकाराची वृक्ष, मोठी वृक्ष अशा विविध वृक्षांची एकत्रित लागवड केली जाते, यामुळे झाडांमध्ये सूर्यकिरण शोषून घेण्याची स्पर्धा निर्माण होते व कमी जागेत अधिक वृक्ष लागवड करूनही झाडांची वाढ झपाट्याने होते. नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने या पद्धतीचा वापर करण्याचे धोरण अवलंबिले आहे. लेबर कॉलनी येथील ग्रीन बेल्ट मध्ये या पद्धतीने २७०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच प्रभाग ०५ मधील कचरा पासून निर्मित खत वापरल्याने झाडे अधिक गतीने वाढतील व जगवली जातील अशी माहिती नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
Comments