लातूर: २० जुलै रोजी संध्याकाळी जिल्ह्यातील हजयात्री मुंबई येथील हज हाऊस येथून मक्का मदिना येथे जाण्यासाठी लातूर रेल्वे स्थानकावरुन रवाना झाले. त्यापूर्वी लातूर रेल्वे स्टेशनवर मानवतेचा संदेश व भारत देशात राष्ट्रीय एकात्मता कायम रहावी यासाठी हजयात्रेकरूंनी प्रार्थना केली. यावेळी मान्यवर हज यात्रेकरुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. लालासाहेब शेख (स्वाभीमानी मुस्लिम विकास परिषद संस्थापक अध्यक्ष), हाजी अब्दुल हाकीम (लातूर जिल्हा काँग्रेस पक्ष शहर सचिव), पत्रकार अब्दुल समद शेख, अझहरभाई सय्यद (निर्माण संस्था संस्थापक अध्यक्ष), प्रा. हारूण देवणीकर, रिझवान सिद्दीकी, इम्रान शेख, अनवर मणीयार, इम्तियाज एजाज शेख, सिद्दीकभाई जब्बार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Comments