लातूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्वास सुरुवात झालेली आहे. या माध्यमातून नवीन सदस्यता नोंदणी करण्यात येत असून लातूर शहरात या सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक भाजपानेदिले आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या भारतीय जनता पक्षाने संघटन पर्वाच्या माध्यमातून नुतन सदस्यता नोंदणी देशभरात सुरु केलेली आहे. सदर संघटन पर्वाचा शुभारंभ ०६ जुलै रोजी करण्यात आलेला असून ११ ऑगस्टला याचा समारोप होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक बळकट होवून प्रत्येक घरा-घरात भाजपाचा सदस्य असावा हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगानेच लातूर शहरातही शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शना खाली सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील विविध ठिकाणी कक्ष उभारणी करुन सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. भाजपाचे शहर जिल्हा संघटन सरचिटणीस गुरुनाथ मगे, सदस्य नोंदणी प्रमुख शिरीष कुलकर्णी, सरचिटणीस तुकाराम गोरे यांच्या पुढाकारातून शिवाजी चौक, गोलाई, सुभाष चौक, पिव्हीआर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक आदि ठिकाणी कक्ष उभारुन सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे. या सदस्य नोंदणी करिता भाजपाचे शहर जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विविध आघाडयांचे पदाधिकारी, मनपा पदाधिकारी, नगरसेवक आदी योगदान देत आहेत. आगामी काही दिवसात शहरातील मुख्य ठिकाणांसह महाविद्यालय परिसरात संघटन पर्वच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून सदस्य नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी केले आहे.
Comments