HOME   लातूर न्यूज

कॉंग्रेसचे नगरसेवक आता सुरु करणार जनसंपर्क मोहीम!

सर्व स्तरातून काँग्रेस पक्षाला पाठींबा मिळविण्याचा अभियानाचा उद्देश


कॉंग्रेसचे नगरसेवक आता सुरु करणार जनसंपर्क मोहीम!

लातूर: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव तथा माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर मनपातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान मोहीम सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. जनतेचे प्रश्न सोडवित असतांना सर्वस्तरातून काँग्रेस पक्षाला पाठींबा मिळविण्याचा या अभियानाचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची पूर्व तयारी करण्यासाठी लातूर मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानचा एक भाग म्हणून लातूर महानगरपालिकेतील सर्व काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार अमित देशमुख यांनी प्रारंभी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. महापालिकेच्या मागच्या कार्यकाळात मंजूर झालेल्याच योजना सध्या राबविण्यात येत आहेत. कोणत्याही नवीन योजनांची सुरूवात झाली नाही याची माहीती नगरसेवकांनी बैठकीत दिली. महापालिकेमार्फत काही तुटपुंजा निधी नगरसेवकांना प्रभागातील कामासाठी दिला गेला असला तरी त्यातही सत्ताधारी मंडळीकडून पक्षीय भेदभाव करण्यात येत असल्याची कैफीयत काही नगरसेवकांनी मांडली. लातूर शहरात विकासकामे कोणी केली आणि कोण करू शकतो याची जाणीव नागरिकांना आहे. यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी थेट जनतेत जावून त्यांच्या समस्या अडचणी ऐकून घ्याव्यात आपल्या परीने त्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना मदत करावी असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले. शहरातील व्यापारी, उदयोजक, व्यवसायिक, नोकरदार, कामगार, मजूर यासर्वच घटकात जावून त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याकडून काँग्रेसपक्षासाठी पाठींबा मिळवावा असे आमदार देशमुख यांनी यावेळी म्हटले. आमदार देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तातडीने जनसंपर्क मोहिम हाती घेतली आहे.
या बैठकीस मनपा विरोधी पक्षनेते दिपक सूळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक पप्पू देशमुख, रवीशंकर जाधव, ओमप्रकाश पडीले, सपना किसवे, मिना लोखंडे, उषा भडीकर, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, दत्ता मस्के, सोजर मदने, विजयकूमार साबदे, रफतबी शेख, अहमदखन पठाण, फरजाना बागवान, पूजा पंचाक्षरी, दिप्ती खंडागळे, युनुस मोमीन, रूबीना तांबोळी, रेहाना बासले, कांचन अजणीकर, कालींदा भगत, अयुब मणियार, कमल सोमवंशी आदी उपस्थित होते.


Comments

Top