HOME   लातूर न्यूज

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आ. अमित देशमुख यांची मदत


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आ. अमित देशमुख यांची मदत

लातूर: लातूर तालुक्यातील रायवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांच्या कुटुंबियासाठी, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एक महिन्याचे सर्व प्रकारचे रेशन पाठवून देऊन तात्पुरती मदत व दिलासा दिला आहे. रायवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांनी सततच्या नापिकीला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली आहे. या संदर्भातील माहिती मिळताच माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी परवा रायवाडी येथे जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली होती, या कुटुंबाचे सांत्वन करून शासकीयस्तरावरून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले होते. पवार यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, अमोल शिवाजी पवार, गणेश शिवाजी पवार, मेघा शिवाजी पवार असा परिवार आहे, या गरीब परिवाराची सद्याची हालाकीची परिस्थिती लक्षात घेऊन व्यतिथ झालेल्या आमदार देशमुख यांनी किमान एक महिना पुरेल इतके धान्य व सर्व प्रकारचे जीवनावश्यक साहित्य व रेशन, सहकाऱ्यामार्फत पाठवून दिले, लातूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष दगडूसाहेब पडिले, जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर वाघमारे, कोंडीराम पवार, सुधाकर पाटील, प्रेम पाटील, बालासाहेब पाटील यांनी शुक्रवार रोजी पवार यांच्या घरी जाऊन रेशन पोचवले.


Comments

Top