लातूर: नटवर्य कै. श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कार मराठी नाटय व चित्रपट तथा दक्षिण भारतीय सिनेमातील स्टार सयाजी शिंदे, भारतीय सिनेमातील गुरुजी पुरस्कार पांडुरंग मुखडे यांना आज प्रदान करण्यात येणार आहे. नाना नानी पार्कवरील अॅंफी थिएटर येथे हा सोहळा होणार आहे. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार अशोक चिंचोले, मॉं जिजाऊ पुरस्कार डॉ. सुरेखा काळे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रा. राजशेखर सोलापुरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कांचन वाघमारे, कै. गोपीनाथ मुंडे पुरस्कार रमाकांत पिडगे याशिवाय साहित्य क्षेत्रात व क्रीडा क्ष्ेात्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी करणा-या गुणवंतास अनुक्रमे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार व क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. लातूर मनपा हे पुरस्कार पहिल्यांदाच देत आहे. पुरस्कार निवडीसाठी स्थायी समितीच्यावतीने त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समित्यांनी दिलेले निर्णय हेच स्थायी समितीने अंतिम केले आहेत. या पुरस्कारांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर हांच्या हस्ते रविवार ०४ ऑगस्ट दुपारी ०४ वाजता अॅम्फी थिएटर, नाना नानी पार्क येथे समारंभपुर्वक होणार आहे. नटवर्य कै. श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्काराचे स्वरुप रु. एक लाख, स्मृतीचिन्ह व मानपत्र तथा इतर सर्व पुरस्कारांचे स्वरुप रु. २१०००/- स्मृतीचिन्ह व मानपत्र असे आहे. समारंभानंतर लोकरंग या संस्थेचा लोकगीतांरील कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या समारंभास उपस्थित रहावे असे अवाहन मनपा लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments