निलंगा: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंग्यात विश्वशांती व जनकल्याण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञास भक्तिमय वातावारणात प्रारंभ झाला. पालकमंत्री निलंगेकर यांनी या निमित्ताने ग्रामदैवत निळकंठेश्वरासह शहरातील विविध देवतांना अभिषेक केला, महापूजा केली. गोमातेचे पूजन करून या यज्ञास प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, पुरोहित माधवाचार्य पिंपळे महाराज उपस्थित होते. हा महायज्ञ होत असताना निलंगा नगरी सजली आहे. शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या असून मंत्रांचा ध्वनी शहरात कुठेही ऐकू यावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा याग ०९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. सात दिवस वेदपठण, पुजेच्या माध्यमातून अंखड महायज्ञ चालू राहाणार आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर, मातोश्री माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर व यज्ञविधी पठण करणारे महाराज माधवाचार्य तसेच विविध भागातून आलेले ब्राह्मण, यांच्यासह पालकमंत्र्यांनी गोमातेचे पूजन केले.
Comments