HOME   लातूर न्यूज

देवणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

लातूर जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या २७.७२ टक्के झाला पाऊस


देवणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

लातूर: जिल्हयात दिनांक 3 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8 वाजे पर्यंत एकूण 299.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्हयाची पावसाची सरासरी ही 30.00 इतकी आहे. तर आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 27.72 टक्के इतका असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हयात सर्वात जास्त पाऊस देवणी तालुक्यात 36.33 मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस लातूर तालुक्यात 16.13 मिलीमीटर इतका झाला. जिल्हयात दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान:
लातूर (16.13. 156.21), औसा (22.57, 143.13), रेणापूर (22.75, 195.75), उदगीर-(33.57, 237.44), अहमदपूर (34.83, 292.00), चाकूर- (34.60, 203.20) 7) जळकोट-(35.50, 294.00) 8) निलंगा-(29.38, 221.33), 9) देवणी- (36.33, 249.47) व 10) शिरुर अनंतपाळ-(34.33, 231.33) असे आहे.
जिल्हयाच्या 10 ही तालुक्यातील पावसाचे प्रमाण 299.99 मि.मी. इतके असून त्याची एकूण सरासरी 30.00 मि.मी. इतकी आहे. लातूर जिल्हयाची 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 802.13 मि.मी. इतकी असून आजपर्यंत झालेला पाऊस 222.39 मि.मी. इतका आहे. व हे प्रमाण जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 27.72 टक्के इतके आहे.


Comments

Top