लातूर: लातूरला विकासात्मक राजकारणाची परंपरा आहे, अलीकडच्या काळात मात्र काही मंडळीकडून ही परंपरा मोडीत काढण्यासाठी कुटनीतीने षडयंत्र रचण्याचे प्रयत्न सुरू आहेत, सुजाण आणि प्रगल्भ् असलेल्या येथील जनतेने यापूर्वी अनेकवेळा असे प्रयत्न हाणून पाडले आहेत, भविष्यातही ते त्याला अजिबात थारा देणार नाहीत याची मला खात्रीच नव्हे तर तसा दृढ विश्वास आहे, असे प्रतिपादन आ. अमित देशमुख यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आ. देशमुख यांनी जनसंपर्क अभियानातर्गत बार्शीरोड वरील संगम हायटेक नर्सरीला भेट दिली. यावेळी तेथे एकत्रित आलेल्या लातूर शहरातील उदयोजक, व्यापारी, वेगवेगळया क्षेत्रातील व्यवसायीक तसेच शिक्षण व अन्य क्षेत्रातील मान्यवरासोबत त्यांनी संवाद सांधला. यावेळी चर्चेच्या प्रारंभी स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना संगमेश्वर बोमणे यांनी उदयोन्मुख तरूणांना आ. अमित देशमुख यांच्याकडून मिळत असलेला पाठींबा, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल धन्यवाद मानले. आमदार देशमुख यांच्या हस्ते आपल्या नर्सरीच्या व्यवसायाचा शुभारंभ झाला होता असे सांगून त्यानंतर वेळोवेळी त्यांनी दिलेलया प्रोत्याहनामुळे या आपल्या व्यवसायाची उलाढाल आज काही कोटीत असल्याचे म्हटले. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी हाच धागा पकडून प्रास्ताविक करताना राज्यात आणि देशातील राजकारणात काय घडते याचे लातूरकरांना काहीच देणेघेणे नाही. लातूरमधील सुरक्षितता, शांतता कायम राहण्यासाठी येथील जनतेला आ अमित देशमुख यांचे नेतृत्व हवे आहे, त्यामुळे या नेतृत्वाला मोठे भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. हंसराज बाहेती, लक्ष्मीकांत धूत, डॉ. एच. डी. कोळेकर, डॉ. अभय कदम, राजाभाऊ गर्जे, ईश्वर बाहेती, दिनेश गिल्डा, समद पटेल, इम्रान शेख, सुपर्ण जगताप, विश्वनाथ इंगळे, मनोज वलागडडे, योगेश शर्मा, सुरेश पेन्सलवार, बी. आर. पाटील, महालिंगअप्पा बोमणे, नानीक जोधवाणी, लक्ष्मण मोरे, गोपल बाहेती, डॉ. राज सारडा, राजगोपाल राठी, मोहन परदेशी, डॉ. भराटे यांच्यासह वनश्री मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक संघ लातूर, माध्यम परिवार, रोटरी कल्ब ऑफ इंडिया लातूरचे पदाधिकारी, सदस्य तसेच व्यापार, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विधी क्षेत्रातील मान्यवर सदस्य नागरिक उपस्थित होते.
Comments