लातूर: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि. नवी दिल्लीच्या वतीने वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २८ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
विलास सहकारी साखर कारखाना स्थापनेपासूनच लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या कुशल नियोजनाखाली यशस्वी वाटचाल करीत आहे. या कारखान्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल विविध राज्य आणि देशपातळीवरील पारीतोषिकांनी गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि. नवी दिल्लीच्या वतीने नुकताच उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पहिला पुरस्कार या कारखान्यास जाहिर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, रविंद्र काळे, चंद्रकांत टेकाळे, वलायतखाँ पठाण, जयचंद भिसे, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, बालाजी साळुंके, रमेश थोरमोटे पाटील, जगदीश चोरमले, भारत आदमाने, व कार्यकारी संचालक एस. व्ही. बारबोले यांची उपस्थित होते.
Comments