HOME   लातूर न्यूज

गरीब गरीबच राहिला पहिजे हेच काँग्रेसचे धोरण होते

भाजपाने गरजू लाभार्थींना विविध योजनेचा थेट लाभ दिला- रमेशअप्पा कराड


गरीब गरीबच राहिला पहिजे हेच काँग्रेसचे धोरण होते

लातूर: गरीब गरीबच राहिला पाहिजे हे काँग्रेसचे धोरण होते. काँग्रेसच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेला विविध योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम झाले. सत्तांतरानंतर केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने सर्वसामान्य गोर-गरीब, गरजूंना विविध योजनेचा थेट लाभ दिल्याने गोर-गरीब जनतेनीच काँग्रेसची केंद्र व राज्य शासनासह सर्व सत्तास्थाने उलथून टाकण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी आयोजित जनसंवाद दौऱ्यातील ठिकठिकानच्या बैठकीत बोलताना केले.
ग्रामविकास विभागा मार्फत मुलभूत सुविधा योजनेंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात मंजूर झालेल्या लातूर तालुक्यात शनिवारी दुपारच्या टप्प्यात निवळी येथे १० लक्ष रुपये, ढाकणी ०५ लक्ष, टाकशी १० लक्ष, भोयरा १० लक्ष रुपये, शिऊर ०५ लक्ष आणि अंकोली येथे १५ लाखाच्या तर रविवारी सकाळच्या टप्प्यात चिकलठाणा ०५ लक्ष, भातांगळी ०८ लक्ष, बामणी ०७ लक्ष, भडी १० लक्ष, ममदापूर १० लक्ष, दगडवाडी १० लक्ष आणि मुशिरागाद येथे १५ लक्ष रुपये खर्चाच्या रस्ता, नाली, सांस्कृतिक सभागृह, स्मशानभूमी शेड आदी विविध विकास कामाचे भूमीपुजन कराड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधताना कराड बोलत होते.
या दौऱ्यात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षिरसागर, रेणापूर पसचे सभापती अनिल भिसे, जिप सदस्य सुरेश लहाने, नगराध्यक्ष अभिषेक अकणगीरे, सतिश आंबेकर, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, श्रीकिसन जाधव, ॲङ दशरथ सरवदे, गोविंद नरहरे, राजकिरण साठे, बाबासाहेब घुले, सुरज शिंदे, भैरवनाथ पिसाळ, बन्शी भिसे, कृष्णा मोटेगावकर, अनंत चव्हाण, वसंत करमुडे, सुधाकर गवळी, बालासाहेब पाटील, समाधान सुर्यवंशी, भारत माने, अभय सोनपेठकर, आनंत कणसे, धनराज शिंदे, रशिद पठाण, विनायक मगर यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. निवळी येथील कार्यक्रमात कालिंदा देशमुख, मंजुषा मायंदे, सोनाली दिवटे, पुजा शिंदे, मनिषा माने यांच्यासह बहुसंख्य महिलांनी भाजपात प्रवेश केला.


Comments

Top