HOME   लातूर न्यूज

अभिनव मानव विकास संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सारडा

सोने विकल्याचे मान्य, १७ तोळे जप्त, आरोपी बुलढाणा जिल्ह्याचे


अभिनव मानव विकास संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सारडा

लातूर: येथील अभिनव मानव विकास संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी डॉ. चेतन सारडा यांची तर सचिवपदी कमलकिशोर अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली. अभिनव मानव विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्थेच्या सभागृहात पार पडली. सभेच्या प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी वर्ष २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी याप्रमाणे: अध्यक्ष- डॉ. चेतन सारडा, उपाध्यक्ष- तेजमल बोरा, प्रकाश कासट, सचिव- कमलकिशोर अग्रवाल, सहसचिव- सुभाष कासले, सूर्यप्रकाश धूत, कोषाध्यक्ष- जयेश बजाज, सदस्य- डॉ. मधुकरराव कुलकर्णी, नंदकिशोर अग्रवाल, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, व्यंकट गर्जे, रमेश भुतडा, डॉ. रमेश जाजू, नरेशकुमार पंड्या, रामप्रसाद राठी, स्विकृत सदस्य- सूर्यकांत कर्वा, दीनानाथ भुतडा, निमंत्रित सदस्य- शांतीलाल कुचेरिया, अतुल देऊळगांवकर, दिलीप माने, शिवकांत ब्रिजवासी, डॉ. सुबोध सोमाणी, संजीव भार्गव, लक्ष्मीकांत सोमाणी. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नूतन अध्यक्ष डॉ. चेतन सारडा यांनी सर्वांच्या सहकार्याने संस्थेच्या यशाचा आलेख सातत्याने चढत्या क्रमाने राहू शकल्याचे सांगितले. सचिव कमलकिशोर अग्रवाल यांनी आपले विचार व्यक्त करतांना सर्व पदाधिकारी आगामी काळातही संस्थेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्रीकिशन सोमाणी विद्यालयाने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असून विद्यालयाच्या वतीने सातत्याने विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. संस्थेच्या या नेत्रदीपक यशात संस्था पदाधिकाऱ्यांसह विद्यालयाच्या सर्व स्टाफचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष, सचिवांचा सत्कार करण्यात आला. या सर्वसाधारण सभेस संस्थेच्या सदस्यांची उपस्थिती होती.


Comments

Top