HOME   लातूर न्यूज

मोदी यांच्यामुळे घराचे स्वप्न साकार झाले, लाभार्थ्यांकडून आभार

कराड यांच्या जनसंवाद दौऱ्यात अनेक कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन


मोदी यांच्यामुळे घराचे स्वप्न साकार झाले, लाभार्थ्यांकडून आभार

लातूर: दगडा-मातीच्या आणि कुडाच्या घरात राहता-राहत आयुष्य सरत आलं. स्वत:साठी घर मिळाले नाही मात्र पोटच्या पोरांसाठी तरी पक्के घर बांधावे असे स्वप्न बघितले होते. ते पक्क्या घराचे स्वप्न नरेंद्र मोदी यांच्या मुळेच साकार झाले अशी भावना लातूर ग्रामीण मतदार संघातील जनसंवाद दौऱ्याप्रसंगी अनेक ठिकाणी भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्याकडे लाभार्थ्यांनी व्यक्त केली. या जनसंवाद दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चर्चेदरम्यान शासनाकडून मिळत असलेल्या विविध योजनेतील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात ग्रामविकास विभागामार्फत मुलभूत सुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या लातूर तालुक्यात रविवारी दुपारच्या टप्प्यात बोरगाव काळे, खंडाळा, माटेफळ, भिसे वाघोली, शिराळा आणि रामेगाव तर सोमवारी सकाळच्या टप्प्यात रेणापूर तालुक्यातील तत्तापुर, गरसोळी, वंजारवाडी, चाडगाव, वांगदरी येथे रस्ता, नाली, सांस्कृतिक सभागृह, स्मशानभूमी शेडसह विविध कामांचे भूमीपुजन त्याचबरोबर कामखेडा, वाला, फरदपूर, बिटरगाव, मोटेगाव आदी गावात लाखो रुपये खर्चाच्या झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण भाजपा नेते कराड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत रमेशअप्पा कराड यांनी जनतेशी संवाद साधला.
गावोगावच्या जनतेसोबत चर्चा व्हावी, अडी-अडचणी समजून घ्याव्यात, काँग्रेस शासनाचा कार्यकाळ आणि सत्तांतरानंतरच्या भाजपा शासनाचा कार्यकाळ कसा वाटतो यासाठी आयोजित जनसंवाद दौरा प्रसंगी त्या-त्या गावातील पारावर, चौकात व इतर सार्वजनिक ठिकाणी रमेशअप्पा कराड यांनी जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी शासनाच्या मिळत असलेल्या विविध योजनेबद्दल उपस्थितांकडून माहिती घेवून चर्चा केली. तेंव्हा उपस्थितांना घरकुल मिळाले का? काँग्रेसच्या काळात घरकुलाला किती पैसे मिळत होते? घरकुल मंजुरीस पैसे द्यावे लागले का? असे अनेक प्रश्न विचारले असता उपस्थितांकडून काँग्रेसच्या काळात घरकुलासाठी ४०-५० हजार मिळत होते. घरकुल मंजुरीसाठी अनेक हेलपाटे मारावे लागले. मंजूर झाल्यास चिरीमिरी द्यावीच लागत होती. मात्र आता भाजपाच्या काळात घरकुल मंजुरीला कुणाच्या मागे जावे लागत नाही. अर्ज भरला की काही दिवसातच मंजूरी मिळताच ३५ हजार खात्यात जमा झाले. घर पुर्ण होईपर्यंत सगळे मिळून ०१ लाख ४० हजार रुपये मिळाले आणि अनेक दिवसाचे माझे घराचे स्वप्न पुर्ण झाले अशी भावना एका महिला लाभार्थीने उपस्थितांसमोर मांडली.
या दौऱ्यात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षिरसागर, रेणापूरचे सभापती अनिल भिसे, नगराध्यक्ष अभिषेक अकणगीरे, सतिश आंबेकर, साहेबराव मुळे, अनंत चव्हाण, ॲङ दशरथ सरवदे, गोविंद नरहरे, पद्माकर चिंचोलकर, राजकिरण साठे, बाबासाहेब घुले, सुरज शिंदे, भैरवनाथ पिसाळ, बन्शी भिसे, कृष्णा मोटेगावकर, अनंत चव्हाण, वसंत करमुडे, सुधाकर गवळी, सुधाकर कराड, चंद्रकांत कातळे, मदन दहिफळे, आनंत कणसे, धनराज शिंदे, रशिद पठाण, विनायक मगर, संतोष चव्हाण, प्रताप पाटील, मनोज कराड, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, लता भोसले, सुनिता माडजे, काशिनाथ ढगे, धनराज शिंदे, गंगासिंह कदम, श्रीकृष्ण पवार यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


Comments

Top