औसा: ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औसा येथे येणार आहे. लामजना येथे यात्रेचे स्वागत केले जाणार असून तुळजापूर टी पॉइंट पासून सभा स्थळापर्यंत हजारो तरुणांच्या पुढाकारातून दुचाकींची रॅली काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा बुधवारी सुरू होत आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री मराठवाड्यात येणार आहेत. ३० ऑगस्ट रोजी ही यात्रा लातूर जिल्ह्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पहिली सभा अहमदपूर येथे दुपारी ०२ वाजता होणार आहे. त्यानंतर ०४ वाजता उदगीर व सायंकाळी ०६.३० वाजता लातूर येथे सभा होणार आहे. मुख्यमंत्री लातूर येथे मुक्कामी आहेत. ३१ रोजी सकाळी १० वाजता लातूर येथे पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता निलंगा येथे सभा होणार आहे. लामजना येथे औसा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाणार आहे. तुळजापूर टी पॉइंटपर्यंत ही यात्रा आल्यानंतर तेथून हजारो दुचाकींच्या रॅलीसह सभा स्थळापर्यंत येणार आहे. दुचाकी रॅलीने शहरात स्वागत होणार आहे. औसा येथील बस डेपोच्या मैदानावर दुपारी ०१. ३० वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. ही सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री उस्मानाबादकडे रवाना होणार असल्याची माहिती अभिमन्यू पवार यांच्या संपर्क कार्यालयातून भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धन भेटेकर यांनी दिली.
Comments