HOME   लातूर न्यूज

लातुरात राजनिवास गुटख्याची दहशत!

अनेकांनी खाणे सोडले, बहुतेकांनी विकणेही बंद केले


लातुरात राजनिवास गुटख्याची दहशत!

लातूर: गुटखाबंदी असली तरी लातुरच काय सगळीकडे सरे आम गुटखा मिळतो. माणिकचंदपासून अगदी साधे गुटखेही मिळतात. काही कंपन्यांचे थेट संपूर्ण गुटखे मिळतात. तर काही कंपन्यांनी पानमसाल्याची वेगळी पुडी तर त्यात मिसळायच्या तंबाखूची वेगळी पुडी मिळते. अलिकडच्या काळात लातुरात राजनिवास नावाचा गुटखा चांगला फेमस झाला होता. या गुटख्याचा पानमसाला आणि त्यात मिसळायच्या तंबाखूच्या पुड्या वेगवेगळ्या मिळतात. काही दिवसांपूर्वी हा गुटखा खाल्ल्याने तोंडाचे गंभीर आजार झालेल्या पन्नास जणांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे अशी जोरदार चर्चा पसरली. ती चर्चा आजही सुरु आहे. यामुळे अनेक गुटखा प्रेमींनी हा गुटखा खाणे बंद करुन दुसरा जवळ केला. तर अनेक विक्रेत्यांनी हा गुटखा ठेवणे बंद केले आहे. अन्न औषध प्रशासनाकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याने या सगळ्या प्रकारावर नियंत्रण करणे कठीण आहे असं याच विभागाकडून खाजगीत सांगितलं जातं!


Comments

Top